WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

5000 गणित वनलायनर प्रश्न व स्पष्टीकरण सिरीज भाग – 1

|
Facebook
---Advertisement---

🔴 गणित मंच 5000 गणित वनलायनर प्रश्न व स्पष्टीकरण सिरीज 🔴

1)  शून्यापेक्षा मोठ्या, 1′ 2,3… अशा मोजता येणाऱ्या संख्यांना काय म्हणतात ❓

👉 नैसर्गिक संख्या 🧑‍🎄

🎯 स्पष्टीकरण: या संख्यांचा संच ‘N’ ने दर्शवतात आणि त्या मोजण्यासाठी वापरल्या जातात.

2) नैसर्गिक संख्या आणि शून्य (0) मिळून कोणत्या संख्यांचा संच तयार होतो?

👉 पूर्ण संख्या (Whole Numbers)

🎯 स्पष्टीकरण: पूर्ण संख्यांचा संच ‘W’ ने दर्शवतात. यात 0, 1, 2, 3, … अशा संख्यांचा समावेश असतो.

3) ज्या संख्यांना p/q या स्वरूपात मांडता येते, जेथे q शून्य नसतो, त्यांना काय म्हणतात?

👉 परिमेय संख्या

🎯 स्पष्टीकरण: यात पूर्णांक (Integers), अपूर्णांक (Fractions) आणि आवर्ती दशांश (Repeating Decimals) संख्यांचा समावेश असतो.

4)  ज्या संख्यांना 1 आणि स्वतःहून  इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यांना काय म्हणतात?

👉 मूळ संख्या (Prime Numbers)

🎯 स्पष्टीकरण: उदा. 2, 3, 5, 7, 11, 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे.

फ्री टेस्ट सोडवा Www.SpardhaMantra.com


5) दोन किंवा अधिक संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक (Highest Common Factor – HCF) 1 असल्यास, त्या संख्यांना काय म्हणतात?

👉 सह-मूळ संख्या

🎯स्पष्टीकरण: उदाहरणे: (4, 9) किंवा (15, 8) या संख्या स्वतः मूळ असण्याची गरज नसते.

6) नैसर्गिक संख्या, शून्य आणि ऋण संख्या (Negative Numbers) मिळून कोणत्या संख्यांचा संच तयार होतो?

👉पूर्णांक संख्या.

🎯 स्पष्टीकरण: पूर्णांक संख्यांचा संच ‘Z’ किंवा ‘I’ ने दर्शवतात. यात …, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, … अशा संख्यांचा समावेश असतो.

7) ज्या संख्यांना p/q या स्वरूपात (जेथे q शून्य नसतो) मांडता येत नाही, त्यांना काय म्हणतात?

👉 अपरिमेय संख्या

🎯 स्पष्टीकरण: या संख्या अनावर्ती आणि अनंत दशांश स्वरूपात असतात. उदा. √2 ,π ,.

8) परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या एकत्र संचाला काय म्हणतात?

👉 वास्तव संख्या

🎯 स्पष्टीकरण: या संख्यांचा संच ‘R’ ने दर्शवतात. या संख्या संख्यारेषेवर  दाखवता येतात.

9) ज्या मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो, अशा मूळ संख्यांच्या जोडीला काय म्हणतात?

👉 जोडमूळ संख्या.

🎯 स्पष्टीकरण: उदाहरणे: (3, 5), (5, 7), (11, 13). (2, 3) ही जोड मूळ संख्या नाही कारण त्यांच्यात 1 चा फरक आहे.

10) ज्या संख्यांना 1 आणि स्वतःहून इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जातो, त्यांना काय म्हणतात?

👉संयुक्त संख्या.

🎯 स्पष्टीकरण: उदाहरणे: 4, 6, 8, 9, 10, 12, …. 1 ही मूळ किंवा संयुक्त संख्या नाही. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे.

📱 आपल्या जवळच्या मित्राला पण शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!