WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

मोठी बातमी ! महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज सुरु आजच तुमचा ऑनलाईन फॉर्म भरुन घ्या : Police Bharti 2025

by R S
|
Facebook
Police Bharti Maharashtra 2025
---Advertisement---

पोलीस भरतीची स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस ग्राउंडवर कसरत करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची सुरुवात आज दिनांक 29 ऑक्टोबर पासून सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

Maharashtra Police Bharti 2025

🔹 विभाग नाव : महाराष्ट्र शासन गृह विभाग

🔹 पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस चालक, कारागृह पोलीस ,बॅण्डमन इ.

🔹एकूण जागा : 16000 पेक्षा जास्त

🔹 शैक्षणिक पात्रता : संबंधित भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच शिक्षण बारावी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे फक्त बँड्समन साठी 10 उत्तीर्ण.

🔹 वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा त्यांच्या जात प्रवर्गनिहाय वेगवेगळी आहे ते तुम्ही पाहून घ्या खालील चार्ट मध्ये फक्त 3 कास्ट add केल्या आहेत त्याची तुम्ही ऑफिसियल Website वरून खात्री करून घेणे व पोलीस भरती साठी अर्ज करणे.

🎯 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत वय संपणाऱ्या सर्व उमेदवारांना एक विशेष संधी या भरतीमध्ये देण्यात आलेली आहे.

जात प्रवर्गवयोमर्यादा
General (सर्वसाधारण)18 ते 28 वर्ष
SC/ST05 वर्ष सूट
OBC03 वर्ष सूट

🔹 अर्जासाठी शुल्क : अर्जासाठी General/OBC प्रवर्गासाठी – 450/- रुपये आणि SC/ST प्रवर्गासाठी – 350/- रुपये आकारण्यात येईल.

🔹 निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया सामान्यतः 3 टप्प्यात पार पाडण्यात येईल, ज्यामध्ये सर्वप्रथम मैदानी चाचणी (Ground), लेखी परीक्षा (Written Exam) व अंतिम कागदपत्र पडताळणीनंतर (Document Verification) उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

🔹 परीक्षासाठी एकूण कालावधी : 90 मिनीट

🔹 Police Bharti New Exam & Syllabus Pattern For Constable Post

विषयएकूण प्रश्नएकूण गुण
गणित25 प्रश्न25 गुण
बुध्दीमत्ता चाचणी25 प्रश्न25 गुण
मराठी व्याकरण 25 प्रश्न25 गुण
सामान्य ज्ञान (GK)व चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

अनु.क्रविषयमहत्वाचे घटक
01गणितसंख्याज्ञान व संख्यांचा प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ काम वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ काम वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
02बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन, आकृती कालमापन, (दिनदर्शित) रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्ष

निरीक्षण आणि आकलन

03मराठी व्याकरणम्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
04सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

🔹 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : 👇

  1. पासपोर्ट आकाराचा कलर फोटो
  2. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी
  3. बारावी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
  4. आधार कार्ड
  5. जात प्रमाणपत्र
  6. अधिक कागदपत्रांसाठी PDF जाहिरात वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇

🔹 शारीरिक पात्रता : पुरुष आणि महिला शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

° पुरुष – किमान उंची 165 सें.मी

° महिला – किमान उंची 158 सें.मी

🔹 शारीरिक चाचणी : संबंधित पोलीस भरतीमध्ये उमेदवारांच्या शारीरिक पात्रतेसोबत शारीरिक क्षमता सुद्धा तपासली जाईल, यामध्ये खालीलप्रमाणे चाचण्या घेण्यात येतील.

  • रनिंग (पुरुषांसाठी 1600 मी. महिलांसाठी 800 मी.) – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण
  • 100 मीटर रानिंग- 15 गुण
  • असे टोटल 50 गुणांचे ग्राउंड घेतले जाते.

🔹 नौकरी ठिकाण : महाराष्ट्र

🔹 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

🔹 अर्ज सुरुवात : 29 ऑक्टोबर 2025

🔹 शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025

पोलीस भरती सर्व जिल्ह्यांची जागांची PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

🚨 पोलीस भरतीच्या सर्व घटक नुसार जागा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता.👇

http://policerecruitment2025.mahait.org

How To Apply For Police Bharti 2025

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. policerecruitment2025
  • मुख्य पानावर New Registration/नवीन नोंदणी करा हा पर्याय निवडा.
  • तुमच संपूर्ण पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका आणि Registration फॉर्म पूर्ण करा.
  • नोंदणी झाल्यानंतर तुमच्या मोबाईल/ईमेलवर User ID व Password येतील.
  • मिळालेल्या User ID व Password टाकून वेबसाईटवर लॉगिन करा.
  • तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे जस पद (उदा. पोलीस शिपाई) निवडा आणि अर्जातील सर्व माहिती नीट भरून पुढे जा.
  • अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क असेल, तर ते ऑनलाईन भरा आणि नंतर सबमिट करा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवा, परीक्षेच्या वेळी उपयोगी पडेल.

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

  • ऑनलाईन अर्ज भरत असताना काळजीपूर्वक तुमचा चालू मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी द्या.
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच अर्ज करा.
  • तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, सही व इतर कागदपत्र योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्ज भरत असताना योग्य जिल्हा व तुमच्या इच्छानुसार पद निवडा.
  • अर्ज काळजीपूर्वक भरा; कारण अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो, याची दक्षता घ्या.
  • एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्ज दुरुस्ती करता येत नाही, त्यामुळे अर्जाची अंतिम छाननी करूनच अर्ज सबमिट करा.

R S

Leave a Comment

error: Content is protected !!